दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी-शहाबाज मुजावर.
करंजफेण .शाहुवाडी तालुक्यातील सोनुर्ले येथील वीस वर्षापासून रखडलेल्या लघुपाटबंधारा प्रकल्पाचे काम पूर्ण. झाल्यामूळे शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली येऊन सुजलाम होणार आहे.या प्रकल्पाच्या मजबूतीकरणासाठी आणखीन निधी आवशक असल्याने निधीची उपलब्धता करून देऊ असे मत आम. डाॅ.विनय कोरे यांनी व्यक्त केले.ते शाहुवाडी तालुक्यातील सोनुर्ले येथील लघुपाटबंधार्याच्या पाणीपुजन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी आम.कोरे यांच्या हस्ते पाणी कार्यान्वित करण्यात आले.
लघु पाटबंधारे विभागाकडून बांधण्यात आलेल्या प्रकल्पाची ०.१३५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असल्यानेसोनुर्लेसह,परळी,नांदारी,नांदगाव,उंड्री,निवडे आदी गावातील सुमारे १२०० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असून याचा मोठा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारा हा प्रकल्प पूर्णत्वास नेल्याबद्दल आम.कोरे यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.तसेच प्रकल्पासाठी अनेक शेतकर्यांनी शेत जमिनी दिल्यामुळे अनेक वर्षापासून रखडलेले प्रकल्पाचे काम पूर्ण करता आल्याचे कोरे यांनी नमूद केले.यावेळी कोरे यांच्या हस्ते शेतकर्यांचा तसेच ठेकेदार सी.पी.बागल यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड ,जि.प.माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील,माजी जि.प.सदस्य शंकर पाटील, बाबा लाड,शिक्षक नेते बाबा पाटील,सरपंच भागोजी पाटील,नामदेव पोवार,
राजन पाटील,रमेश कांबळे,अर्जून पाटील,प्रशांत पाटील,विजय बाऊचकर,संदिप यादव,दगडू पाटील तसेच कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.