दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यातील मौजे सूरपिंपरी येथील दोन तरुणांची भारतीय सेवेत निवड झाली असल्यामुळे परभणी येथील निवासी जिल्हाधिकारी यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.
गोविंद नामदेवराव धुमाळ यांची भारतीय सैन्यात तर अनिकेत बंडूजी गायकवाड यांची वैमानिक म्हणून निवड झाली आहे. या दोन्ही विभागात झालेली निवड म्हणजे भारत मातेची सेवा केल्या समान आहे.
त्यांच्या या निवडीमुळे सर्वत्र आनंदी वातावरण आहे. सूरपिंपरी मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात संपूर्ण ग्रामस्थांनी एका कार्यक्रमात अभिनंदन व सत्कार करण्यात आला. परभणी जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी महेश वडजकर यांनी या दोन्ही वीर पुत्रांचा यथोचित सन्मान करुन त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या तर परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी त्या दोघांचेही तोंड भरुन कौतुक करत पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेछ्या दिल्या. त्याचबरोबर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पाटील साहेब यांच्या हस्ते सुध्दा सत्कार झाला. त्या दोघांनाही श्री. पाटील यांनी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी समस्त गावकरी मंडळी, शिवाजी गायकवाड, मुंजाभाऊ पौष, ॲड. चंद्रशेखर कुळकर्णी, रामभाऊ हराळे, बाळू गायकवाड, बंडू गायकवाड, दुर्लक्ष महाराज, माऊली गायकवाड, दिलीप ससाणे, मेहेत्रे साहेब व अन्य मंडळी उपस्थित होते.