
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात मंदा प्रकाश साबणे या परिसेविकेस कर्तव्यावर असतांनाच मारहाण केल्याप्रकरणी मिनाक्षी सूर्यवंशी या वरिष्ठ अधिसेविकेविरोधात नानलपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आपले कर्तव्य बजावत असलेल्या परिसेविका मंदा साबणे यांना सोमवारी दुपारी दोन वाताच्या सुमारास अधिसेविका मिनाक्षी सूर्यवंशी यांनी काही तरी कामानिमित्त दुसऱ्या वॉर्ड मध्ये जाण्याचे फर्मावले. तेथे साबणे ह्या काम करीत होत्या. तेवढ्यात तावातावाने आलेल्या अधिसेविका सूर्यवंशी यांनी साबणे यांना अर्वाच्य शिव्या डाळी केली. एवढ्यावरही समाधान झाले नसावे म्हणून की काय, त्यांनी साबणे यांना चक्क धोपटायला सुरुवात केली म्हणून साबणे यांनी त्यास प्रतिकार केला. त्याचा राग अनावर आलेल्या सूर्यवंशी यांनी चक्क साबणे यांच्या दोन्ही हातांना जबरी चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले.
याप्रकरणी साबणे यांनी नानलपेठ पोलिसांत यात
री उशीरा दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. साबणे यांच्यावर शासकीय रुग्णालयातील अपघात विभागात उपचार सुरु आहेत तर तिकडे सूर्यवंशी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे. एकूणच या प्रकरणाने रुग्णालयात व परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.