
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : इयत्ता बारावी इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या शिक्षकांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांची कसून चौकशी केली असता ते करीत असलेल्या कॉपी विद्यार्थ्यांसाठीच होत्या, हे निष्पन्न होऊन सदर शिक्षकांनी मान्य व कबूल केले आहे. अशा प्रकारचे गोरखधंदे करण्यात लिप्त सहा शिक्षकांच्या विरोधात गुन्हे नोंदवून त्यांच्या चक्क आवळल्या गेल्या आहेत. ज्ञान धान्याचं पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षण खात्यालाच या शिक्षकांनी पूरते गोत्यात आणले आहे. कुंपणानेच शेत खाल्ले तर ….या उक्तीप्रमाणे शिक्षकानेच कुटील प्रवृत्ती अंगीकारली तर विद्यार्थी कसे सुधारले जातील वा शासनाच्या योजना पारदर्शक कशा बनल्या जातील किंवा शिक्षणात सुसुत्रता ती कशी येवू शकेल असे नानाविध प्रश्न उभे राहिले जातील. त्यामुळे संपूर्ण शिक्षक वर्गात प्रचंड खळबळ माजली आहे.
परभणीच्या सोनपेठ शहरालगत असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाची परिक्षा होती. अकरा वाजता प्रश्न पत्रिका देताच दोन शिक्षकांनी त्या प्रश्न पत्रिकेचे वॉटस्आप वर फोटो काढून ते इतर शिक्षकांना पाठवण्यात आले. ज्यांना ते फोटो पाठवले, ते शिक्षक सदर शाळेच्या पाठीमागे एका खोलीत विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करीत होते. यांची भेट लागताच सोनपेठ पोलीस पथकाने त्या खोलीत शिताफीने धाड टाकून सदर शिक्षकांच्या रंगेहाथ मुसक्या आवळल्या.
दिवसभर बारकाईने केलेल्या चौकशीत सदर शिक्षकांनी शासनाच्या कॉपीमुक्त योजनेला दिलेला छेद शैक्षणिक धोरणालाच काळीमा फासणारा होता, हे शिक्षण विभागाला एका अहवालाद्वारे निर्देशीत केले. रात्री उशीरा महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळ व इतर विधीनिष्ठ परिक्षांवर ये होणारे गैरप्रकार प्रतिबंध करणेबाबत अधिनियम १९८२ कलम ५,७,८ नुसार सदर सहाही शिक्षकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ जेरबंद केले.
एका बाजूला शासन, शिक्षण मंडळ, शिक्षणात व परिक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कॉपीमुक्त, भयमुक्त वातावरणात परिक्षा पार पाडल्या जाव्यात यासाठी निरनिराळ्या उपाय योजना आखत आहे, त्या कार्यान्वित ठेवत आहे. त्यासाठी खडा पहारा, बैठी पथके, भरारी पथके तैनात ठेवली जात आहेत तर दुसरीकडे विद्यार्थी सुधारले जावेत यासाठी प्रयत्नशील राहाण्यापेक्षा परिक्षा केंद्रांवर कार्यरत शिक्षकांकडून प्रश्न पत्रिका फोडून कॉपी पुरवठा करुन त्यांना बिघडवले जात आहे. एवढेच नाही तर शासन व शिक्षण मंडळाच्या योजनेलाच छेद देत हरताळ नव्हे नव्हे काळीमाच फासण्याचे दुष्कृत्य या शिक्षकांकडून केले गेले आहे. परिणामी संपूर्ण शिक्षण विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
ज्या सहा शिक्षकांना अटक करण्यात आली आहे, त्यात कालिदास कुळकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयंताला, रमेश मारोती शिंदे, सिध्दार्थ सोनावणे आणि भास्कर तिरमले यांचा समावेश आहे. ज्यामुळे शासनाच्या, शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त, भयमुक्त योजनेला या सर्वांनी पूर्णपणे हरताळ फासला आहे. कुंपणानेच शेत खाल्ले तर…या उक्तीस अनुसरुन शिक्षकांनीच असे अन्य कृत्य करुन शासन व मंडळाच्या योजनेला हरताळ फासला तर या कारभारात सुसूत्रता ती कशी येऊ शकेल ? हा खरा सवाल आहे.