
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- नावंद्याचीवाडी ता. कंधार
जि. नांदेड येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन दि.२४/०२/२०२३ रोज शुक्रवारी करण्यात आले आहे.सकाळी ८ वाजता राजमाता जिजाऊ माँ साहेब व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येईल.दुपारी ४ वाजता श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्यांने काढण्यात येईल.तसेच महाराष्ट्रातील समाज प्रबोधनकार नामवंत कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांचे किर्तन रात्री ८ वाजता होनार आहे तरी या कार्यक्रमाला परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची सोभा वाढवावी अशी विनंती
आयोजक – समस्त गावकरी मंडळी नावंद्याचीवाडी ता.कंधार यांनी केली
आहे.