
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
लातूर/अहमदपूर:- दि २३ फेबुवारी २०२३ रोजी जानकी संत गाडगे बाबा यांची जयंती करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य केतन प्रदीप खोमणे सर यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन केले . तसेच या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन गोपाळ मेहत्रे सर यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार सुचिता खोमणे यांनी मानले. या कार्यक्रमाला अजय स्वामी, विद्यासागर धूळगुंडे, सलीम पठाण,उद्धव बेंबडे ,उमादेवी गायकवाड आदी कार्यालयीन कर्मचाऱ्यांसोबतच विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.