
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :कौठा :- मोल मंजूरी करत मुलांना शिक्षण देणे याकाळात कठीण असले तरी जिद्द चिकाटी मेहनत करत शिक्षण घेणाऱ्या तरुणांची ग्रामीण भागात संख्या कमी नाही आई वडीलावर आलेला प्रसंग आपल्यावर येऊ नये यासाठी दिवस रात्र मेहनत करुण रिकाम्या वेळेत अभ्यास करणारा अस्लम सय्यद या तरुणाने भारतीय सैन्य दलात भरती झाल्याने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.कंधार तालुक्यातील कौठा येथील अस्लम सय्यद यांचे वडील नवाज सय्यद हे हाँटेलमध्ये कामगार आहेत आई रोजंदारीने शेती कामांसाठी जाते वडिल भाऊ मिस्त्री कामगार आहे अस्लमचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले आहे पुढील शिक्षण घेण्यासाठी घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यानें शिक्षण थांबवत आई वडीलांना कामात मदत करत सैन्य भरतीची तयारी करु लागला व दिवसभर मिळेल ते काम हमाली तर कधी मिस्त्रीच्या हाता खाली कामाला जात सैन्य दलात जाण्याचे स्वप्न सत्यात उतरविलेल्या अस्लम सय्यद यांचे सर्वंच स्तरातून स्वागत होत आहे