दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. जय जाधव यांनी बुधवारी (ता. २२) रोजी देगलूर तालुक्यातील मौजे होट्टल येथे सदिच्छा भेट देऊन चालुक्यकालीन हेमाडपंथी मंदिराची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
चालुक्यकालीन शिल्पकलेचा शिल्पकलेचा हा ठेवा आपल्या पिढीसाठी अत्यंत मोलाचा असून गावकऱ्यांनी तो ठेवा जपला हे फार चांगले झाले. मराठवाड्याच्या अगदी टोकाला असलेले ही मंदिरे जगाच्या पाठीवर येण्यासाठी इनोस्कोशी जोडले जावेत अशी अपेक्षा गावकऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यावर डॉ. होती. जय जाधव यांनी ही मंदिरे जगाच्या पाठीवर आली तरच राज्यासह देशातील पर्यटक येथे येऊन या भागाचा सर्वांगीण विकासाला मोठा हातभार लागेल. शिल्पकलेचा असलेला हा अलौकिक ठेवा पर्यटकांपर्यंत जायला हवा. पर्यटकांची वर्दळ वाढलीकी येथील रोजगाराच्या नवनवीन संधीही मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. त्यातून या भागाचा सर्वांगीण आर्थिक विकास होईल असेही यावेळी बोलताना ते म्हणाले. हेमाडपंथी मंदिर परिसराची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी मंदिर समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. मिलिंद शिकारे, सरपंच प्रतिनिधी युसुफसेठ, माजी सरपंच शेषेराव सूर्यवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे, मरखेलचे पोलिस निरीक्षक गीते, वाघमारे यांच्यासह गावकऱ्यांची या वेळी उपस्थिती
या वेळी बासरी वादक एैनोदिन वारसी यांच्या होट्टल वेनूवृंद ग्रुपने बासरी वादन करून उपमहानिरीक्षक डॉ. जय जाधव यांचे स्वागत केले. मंदिर परिसराची माहिती माजी सरपंच शेषेराव सूर्यवंशी यांनी देऊनउपस्थितांचे आभार मानले.