
दैनिक चालु वार्ता
जळगाव शहर प्रतिनिधी
भानुदास पवार
जळगाव-२४-नोव्हेंबर:भारतीय खाद्य निगम यांच्या वतीने “आजादी का अमृत महोत्सव” कार्यक्रम खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थित उत्साहात संपन्न
भारताच्या स्वातंत्राच्या ७५ व्या वर्षानिमित्त “आजादी का अमृत महोत्सव” कार्यक्रम अंतर्गत भारतीय खाद्य निगम,मंडळ कार्यालय मनमाड यांच्या वतीने माननीय *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत “आयकॉनिक विक ऑफ आझादी का अमृत महोत्सव” चे आदित्य फार्म, जळगांव येथे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भारतीय खाद्य निगम यांच्या विषयी बोलतांना सांगितले की, देशाच्या प्रत्येक नागरिकास अन्न सुरक्षा प्रदान करण्यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार भारतीय खाद्य निगम अन्नधान्यांचा बफर स्टॉक ठेवते. राज्यात व केंद्रशाषित प्रदेशात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमन अंतर्गत अन्नधान्यांची पूर्तता करते, तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी किमान आधारभूत किंमतीने अन्नधान्यांची काह्रेडी करते.
कोविड काळात मार्च ते नोव्हेंबर २०२० काळात २८००३ रेल्वे मालगाडीद्वारे ७८५ LMT अन्नधान्याची वाहतूक करण्यात येऊन, भारतीय खाद्य निगम मार्फत “हर घर अन्न” हा नारा देत “प्रधानमंत्री करीब कल्याण योजना” द्वारे देशभरात ५६५०४६ LMT धान्याचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच भारतीय खाद्य निगम द्वारे शाळकरी मुलांसाठी असलेली “मध्यान्य भोजन” व यासारख्या बऱ्याच योजना राबविल्या जात आहे.
अश्याप्रकारे भारतीय खाद्य निगम देशातील प्रत्येक नागरिकाच्या अन्न सुरक्षेसाठी निरंतर कार्यरत असून, भविष्यातही कार्यरत राही याबाबत खासदार श्रीमाती रक्षाताई खडसे यांनी उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी सदर कार्यक्रमास खासदार श्रीमाती रक्षाताई खडसे यांच्यासह भारतीय खाद्य निगम विभागीय व्यवस्थापक श्री.बी.एम.राऊत, विभागीय उपव्यवस्थापक श्री.अविनाश दाभाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सुनिल सूर्यवंशी, श्री.प्रशांत कुलकर्णी व भारतीय खाद्य निगमचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.