दैनिक चालु वार्ता म्हसळा रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – २२ फेब्रुवारी २०२३ रोजी म्हसळा तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI कॉलेज येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, खेळाडूवृत्तीला संधी मिळावी यासाठी कॉलेज स्तरावर कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, १०० मी,२००मी,४०० मी रिले, गोळा फेक , थाळी फेक,कॅरम , बुद्धीबळ आदी स्पर्धा मुले, मुली गटात घेण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले., विद्यार्थ्यांनी ईशस्तवन जय जय प्रथमेशा आणि स्वागत गीत हा स्वागताचा सोहळा सादर करून कार्यक्रमाला प्रारंभ केला.यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते मेडळ , प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे क्रिडा शिक्षक व उपक्रमशील शिक्षक श्री जयसिंग बेटकर सर, शिक्षण प्रेमी अमाम शिरशीकर , नवशाद शिरशीकर, मनशूर शिरशीकर, प्राचार्या प्रतिभा चव्हाण मॅडम, वृंदा कानल मॅडम, सुष्मिता भिवंडे मॅडम, घरत सर,शिरसाट सर, दिपक सातबेकर सर, अभिनव पाटील, सोहम नांदगावकर,शुभम मोरे, अभिषेक दिवेकर सर आणि ईतर कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.
कॉलेज स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी वैयक्तिक बुध्दिबळ (मुले) आर्य मोकल , पार्थ मोकल , गोळा फेक (मुले )निहार धुमाळ, सिध्दार्थ भोनकर थाळी व गोळा फेक (मुली)तम्मना येलवे,पुजा जंगम थाळी फेक (मुले) हर्ष पाटील, अभिजित म्हात्रे ,धावणे १०० मी अभिजित म्हात्रे,राज जंगम,२०० मी अभिजित म्हात्रे,राज तोडणकर, सांघिक खेळ -४०० रिले प्रथम क्रमांक प्लंबर ट्रेड चे विद्यार्थी, द्वितीय फिटर चे विद्यार्थी गृप, कॅरम- प्रथम क्रमांक फिटर, द्वितीय क्रमांक प्लंबर, कबड्डी प्रथम क्रमांक वेल्डर विभाग विद्यार्थी गृप, द्वितीय क्रमांक फिटर विद्यार्थी गृप, क्रिकेट खेळात – प्रथम फिटर गृप टिम द्वितीय इलेक्ट्रेशन विद्यार्थी गृप विजयी झाले.
क्रिडा शिक्षक बेटकर सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि खेळ या दोन्ही ची सांगड घालून मार्गदर्शन केले.कॉलेज स्तरावर
क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि सांस्कृतिक कार्यक्रम हि उत्सवात संपन्न झाले. या कार्यक्रमात संगिताची साथ पार्थ नाक्ती,निहार धुमाळ यांनी दिली.स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.अभिजीत म्हात्रे आणि आभार प्रदर्शन सुष्मिता भिवंडे मॅडम यांनी केले.