दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- शिवकुमार बिराजदार
मुखेड येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मुखेड दिनांक 15.02. 23 बुधवार पासून सलग 5 दिवस शिवचरित्र कथा प्रबोधनात्मक कीर्तनाचे कार्यक्रम व विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली.
दि. 19 फेब्रुवारी रविवारी या दिवशी सकाळी 9:00 वाजता सोमनाथ बंडे मित्र परिवाराच्यावतीने विद्यमान आमदार तुषार राठोड साहेब डॉ.हिमगिरे साहेब, लक्ष्मण पाटील खैरकेकर, खुशाल पाटील उमरदरीकर, व्यंकटराव लोहबंदे इ. अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित मोटार सायकल, रॅली काढण्यात आली.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास व प्रतिमेस सदाशिव पाटील जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
9:30 वाजता मुखेड कंधार मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले डॉ. तुषार राठोड आमदार निधीतून प्राप्त झालेल्या छ. शिवाजी महाराज यांच्या विकास कामाचे भूमिपूजन डॉ. दिलीप पुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आमदार तुषार राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की मी मागील काळात आश्वासन दिल्याप्रमाणे छ. शिवाजी महाराज पुतळ्यास 10लाख रुपये आमदार स्थानिक निधीतून मंजूर करून दिला आहे आणि येत्या काळात पुढील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी भविष्यात निधी कधीही कमी पडू देणार नाही. असे आश्वासन दिले. उपस्थितयावेळी डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, दशरथराव लोहबंदे, खुशाल पा. उमरदरीकर, व्यंकटराव लोहबंदे, लक्ष्मण पा.खैरकेकर, , श्रावण रॅपनवाड, अनिल जाजु, नागनाथ पाटील बेळीकर, किशोर चौहान, शिवाजीराव जाधव, बालाजी पाटील कबनुरकर, नागनाथ लोखंडे, डॉ.व्यंकट सुभेदार भोसले, डॉ. वीरभद्र हिमगिरे, गंगाधर पाटील, बालाजी बंडे, रामदास पाटील जाधव, बालाजी पाटील जाहूरकर, बालाजी पाटील ढोसने, राजु घोडके, शिवाजी गेडेवाड,, ॲड.गोविंद डुमणे,अंतेश्वर पाटील, अॅड.संजय भारदे, गोंविद घोगरे, गोविंदराव जाधव, देविदास सुडके, हेमंत घाटे, संदीप काळे, मिलिंद लोहबंदे, साईनाथ बोईनवाड, , बबन ठाकूर, दिनेश पाटील केरुरकर, गिरीधर पाटील केरुरकर, रामेश्वर पाटील इंगोले,पंकज गायकवाड, शंकर चितंमवाड, सुनील आरगीळे यांच्यासह विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, डाॅक्टर, वकील, पत्रकार, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी, महिला, बालक, युवक व शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
*चौकट*
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमुद्रा ग्रुपच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील इंगोले यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मुख्य रस्त्याने भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. राजमुद्रा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, व युवक,शिवप्रेमी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चौकट*
काल्याचे किर्तन 11 ते 1 वेळेत हभप गंगाधर महाराज कुरुंदकर यांचे झाले या कार्यक्रमात उपस्थित मा.जी.प नांदेड अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, डॉ. श्रावण रॅपनवाड, राजू पाटील रावणगावकर, संतोष बोनलेवाड, सुरेश पाटील बेळीकर हणमंत नारळीकर , गणेश पाटील बेळीकर, शंकर पाटील जांभळीकर, विशाल गायकवाड, यांच्यासह इत्यादी सर्वजण उपस्थित होते.
चौकट…
शिवसेनेच्या वतीने महाप्रसाद व मिरवणुकीवर पुष्पवृष्टी…
मुखेड शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनुरकर व शहरप्रमुख बंजरंग कल्याणी यांच्या नेतृत्वाखाली महाप्रसाद वाटप व मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली यशस्वितेसाठी राजु गंदपवाड, सचिन रिंदकवाले, बालाजी आईलवाड, सतिष डाकुरवार, रवी गंदपवाड, भवानिसिंह चौव्हान,आकाश पा.केरुरकर, बाबुभाई शेख यांच्यासह शिवसेना,युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
दुपारी 4 वाजता वाजता गणाचार्य मठाचे मठाधीश शिवलिंग शिवाचार्य डॉ. वीरूपाक्ष महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी ढोल ताशा पथक, गोंधळी, काठी फिरवणे व ऐतिहासिक शिवचरित्रावरील देखावे,गुरुदेव प्रा शाळा, गुरुकुल इंग्लिश स्कूल, ममता मॅडम यांचे मास्टर डी, एस, एस इंग्लिश स्कूल यांची उपस्थिती होती
*चौकट*
या मिरवणुकीवर राहुल लोहबंदे माजी नगरसेवक यांच्या मित्र परिवाराच्या वतीने पुष्पवर्षी करण्यात आली.
मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांचे ढोल ताशा पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. व मुलींनी केलेल्या, छ. शिवाजी महाराज की जय, छ. संभाजी महाराज की जय
राजमाता जिजाऊ आईसाहेब यांचा विजय असो, आणि हरहर महादेव, हर हर महादेव, अशा शिवगर्जना व घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. तसेच मुखेड मधील मुख्य रस्त्याने ही मिरवणूक निघून पूर्ण गावांमध्ये फिरून शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ येऊन विसर्जित झाली. या कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी, मुखेड पोलीस प्रशासन, मुखेड शिवजन्मोत्सव संयोजन समिती व पदाधिकारी, शिवप्रेमी, व सर्व मुखेडवासीयांनी विशेष सहकार्य केले.