
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा दवणे..
मंठा तालुक्यातील तळणी परिसरात सरहद वडगाव येथील पुलावरून 22 फेब्रुवारी बुधवार रोजी हार्वेस्टर मशीन उलटल्याने (पलटी झाल्याने) एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. मृत व्यक्ती पंजाबचा असून त्याचे नाव साबू सिंग वय 48 वर्ष पूर्ण नाव माहित नाही. जखमी व्यक्तीचे नाव रंगनाथ गजानन तिरुखे वय सतरा वर्ष राहणार वखारी वडगाव तालुका जिल्हा जालना येथील आहे. सदरील मशीन वखारी वडगाव येथील असून मशीनवर नंबर नसल्याने, मशीनचे नंबर समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत त्या व्यक्तीचा कोणती ओळखपत्र नाही म्हणून ओळख अजून पटली नाही यावेळी तळणी पोलीस कातकडे व काळे हजर होते. पुढील तपास मंठा पोलीस करत आहेत.