
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
(भव्य मोटरसाइकिल रॅली शोभा यात्रा काढण्यात आली ठिक ठिकाणी बापुजी स्वागत)
मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील योगिधाम आश्रमात तपस्वी संत योगानंद महाराज यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला योगीधाम आश्रमापासून शोभायात्रा प्रस्तान काळुबा महाराज मंदिर दर्शन जगदंबा देवी दर्शन
घेऊन ग्रामप्रदक्षणा करण्यात आली यावेळी भाविक भक्त ग्रामस्थांनी दरासमोर रांगोळी काढून महाराजांचे स्वागत केले. त्यानंतर बापुजींनी भाविक भक्तांना आशीर्वाद रुपी मार्गदर्शन केले व लगेच महाप्रसाद वितरण करण्यात आले यावेळी गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण माजी नगराध्यक्ष नितीन भैय्या राठोड ,माजी सभापती संभाजी खंदारे ,राजेश मोरे उपसभापती कृ. ऊ. बा. स. , पंचायत समिती सदस्य बाबा राठोड मोहन राठोड दे. वायसा
अविनाश चव्हाण, उध्दव पवार, दिलीप चव्हाण, दिलीप राठोड,देविदास राठोड,विनोद पवार, विजय राठोड ,संतोष पवार वकिल राठोड, सह जालना औरंगाबाद, परभणी,बुलढाणा जिल्ह्यातील भाविकासह अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी बापूजींना जन्मदिन सोहळ्याच्या शुभेच्छा देत शुभआशीर्वाद घेन्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामस्त तथा पचंक्रोशीतील भाविक भक्तांनी परिश्रम घेतले
🎆
परम पूज्य संत श्री योगानंद बापु महाराज यांच्या जन्मदिना निमीत्त जालना येथील नवजिवन हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर आशिष राठोड यानी मोफत आरोग्य तपासणी शिबीर चे आयोजित करण्यात आले त्यात तपासणी शिबिरात १४५ रुग्ण ची तपासणी करण्यात आली.