
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- मराठवाडा मुक्तिसंग्रामातील पहिले हुतात्मा वेदप्रकाश आर्य यांचा वीर बलिदान दिन साजरा केला.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन म्हणजेच
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव साजरा केला. या निमित्त गुरुवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता १ मिनिटाचे मौन पाळून हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील पहिले हुतात्मा व गुंजोटि गावचे सुपुत्र वेदप्रकाश आर्य यांना श्रद्धांजली अर्पण केली.
भूम तहसील कार्यालयासमोर स्वतंत्र लढ्यासाठी आणि हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले अशा हुतात्मा स्मारकाची भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वच्छता करून फुले अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
हैदराबाद मुक्तिसंग्राम हा मराठवाडय़ातील सर्व नागरिकांच्या आत्मसन्मानाचा विषय आहे. या मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचा इतिहास प्रत्येक नागरिकाला समजावा , विद्यार्थ्यांना इतिहास माहीत असावा, नवयुवकांसमोर प्रेरणादायी राहावा, यासाठी गावोगावच्या स्मारकासमोर प्रामुख्याने साफसफाई स्वच्छता करून हा कार्यक्रम घेण्यात आला.
वन्दे मातरम्, भारत माता की जय,
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचा विजय असो अशा प्रकारच्या दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता , यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आदम शेख, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, उपाध्यक्ष बाबा वीर , शहराध्यक्ष शंकर खामकर, अल्प संख्याक तालुकाध्यक्ष महेबूब शेख, उद्योग आघाडीचे तालुका अध्यक्ष बापू बगाडे, मीडिया विभाग अध्यक्ष सुजित वेदपाठक सहा असंख्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.