दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील दुधोडी गावचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,
धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन, राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील दुधोडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी शाखा प्रमुख भागवत गावडे बबन महानवर सरपंच, अरुण भैर उपसरपंच, श्रीहरी महानवर ग्रा सदस्य , सर्जेराव मार्कड, जयराम कालवडकर, छगन महानवर,रुईदास कालवटकर,, विकास वाळसंकर, विलास महानवर, महारुद्र महानवर, बालाजी कालवटकर, जेष्ठ नेते जयसिंग महानवर, ई. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेना नेते श्री.प्रशांत बाबा चेडे, शिवसेना धाराशिव उपजिल्हाप्रमुख श्री.दत्ता बापू मोहिते, माजी.प.स. उपसभापती भूम तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, जाबचे सरपंच समाधान भोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.