
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / जोशीसांगवी :-उस्माननगर येथून जवळच असलेल्या जोशीसांगवी येथे शिंदे कोचिंग क्लासेस इ. पहिली ते दहावी सेमी इंग्रजी व मराठी माध्यम जोशी सांगवी ता. लोहा येथे दि. २१ फेब्रुवारी २०२३रोजी प्रति वर्षे प्रमाणे शिंदे कोचिग क्लासेसचा
व शिवजन्मोत्सव निमित्त जाहीर व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला. विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवभाऊ देवसकर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र , तसेच प्रसिद्ध व्याख्यान शिवश्री सोपान कदम व प्रमुख पाहुणे म्हणून सुनिल पल्लेवाड पोलीस उपनिरीक्षक उस्मान नगर पोलीस स्टेशन उस्माननगर, गोविंद बोदेमवाड समता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, संजय रुद्रावार, बुडुवार ,उदय कुलकर्णी सूर्यभान मोरे , डॉक्टर अवधूत मोरे ,गजानन मोरे पोलीस उपनिरीक्षक,प्रशांत मोरे आरटीओ , शंकर बंथलवाड, नारायण गुडेवार,गणी शेख, फिरोज शेख कम्प्युटर इंजिनिअर, गजानन मोरे सक्सेस अकॅडमी सिडको संचालक, व जोशीसांगवी येथील सर्व अधिकारी वर्ग डॉक्टर इंजिनिअर ,कर्मचारी व सर्व जोशीसांगवी नगरीचे भुमीपुत्र उपस्थितीत होते .व सरपंच उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष हे ही उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महामानवाची दीप प्रज्योलन करून या कार्यक्रमाची सुरूवात झाली व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले तसेच भाषण व गीते, नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले.या सोहळ्यास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता माधवराव मोरे श्रुती संतोष मोरे व अक्षरा मोरे यांनी केले , अध्यक्षांचे स्वागत श्री शिवाजी पाटील शिंदे यांनी केले. अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतल्यामुळे .बाबाराव शिवाजीराव शिंदेसर संचालक कोचिंग क्लासेस यांचा सत्कार संजय मोरे माजी उपसरपंच माधवराव मोरे,बालाजी मोरे संतोष मोरे, ओम मोरे व इतर मान्यवराणी केला, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक बाबाराव शिंदे यांनी केले.