
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -प्रेम सावंत
परभणी: येथे आयोजित भूमीपूजन व कोनशिला अनावरण कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रमुख महत्त्वकांक्षी रस्त्यांची दुरुस्ती, रुंदीकरण, पूल बांधणी, रिंगरोडसह इतर विविध विकास कामांचे भूमीपूजन व कोनशिला अनावरण सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग तथा जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी गंगाखेड विधानसभेच्या कार्यक्षेत्रातील इसाद ते किनगाव २७ किलोमीटर रस्त्यासाठी १२५ कोटी, गंगाखेड ते लोहा ४५ किलोमीटर रस्त्यासाठी ५०० कोटी, गंगाखेड ते परभणी रस्त्यावरील गोदावरी नदीवर पूल बांधणीसाठी १५० कोटी व गंगाखेड शहरातील वाहतूक कोंडी दूर करणारा
रेल्वे ओव्हर ब्रीज अशा विविध विकास कामांसाठी नितीन गडकरी यांनी मंजूरी देऊन गंगाखेड विधानसभेच्या सर्वांगिण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
या कार्यक्रमास परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आ.सुरेश वरपूडकर, आ.मेघनादीदी बोर्डीकर, आ.डॉ.राहुल पाटील, आ.विप्लव बजोरिया, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, माजी आ.सुरेशदादा देशमुख, जिल्हाधिकारी आंचल गोयल, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.इंद्रमणी यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी,विविध पक्ष व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, पत्रकार, कार्यकर्ते व परभणी जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.