दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
राज्यस्तरीय धम्म परिषदेचे सर्व पत्रकार बांधवाना निमंत्रण देताना संयोजक.
भूम:- शहरामध्ये प्रथमच भव्यदिव्य अशा उपायुक्त राज्यस्तरीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून रविवार दि २६ फेब्रुवारी रोजी दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . त्याग मूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमासाठी भदंत भिक्कु मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. भूम शहरातील माता रमाई नगरीमध्ये यश मंगल कार्यालय परांडा रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे . रविवार २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८-३० ते ९ – ३० शहरातुन भव्य धम्म रॅली काढण्यात येणार असून पहिल्या सत्रामध्ये प्रमुख धम्म देसना डॉ. हर्षवर्धन महाथेरो औरंगाबाद, नागघोष महाथेरो पुणे, भिक्खू पैयानंद थेरो लातूर, धम्मदीप थेरो यवतमाळ, संगपाल थेरो आसाम, एस राहुल औरंगाबाद, जयंत बोधी सिक्कीम, सुमंगल परळी, संघरत्न औरंगाबाद, आर्याजी रूपानंदा हिंगोली उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रा मध्ये संविधान फाउंडेशन नागपूरचे तथा सेवानिवृत्त आय ए एस अधिकारी ई झेड खोब्रागडे अध्यक्षस्थानी राहणार असून उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर या धम्म परिषदेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जालना चे आशिष
बनसोडे साहेब मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. राजनाथ जवळगेकर नाशिक प्रदीप पोळ , , जिल्हाधिकारी उस्मानाबाद महेंद्र कुमार कांबळे, प्राचार्य प्रशिक्षण केंद्र जालना विलास खिल्लारे, तहसीलदार भूम उषाकिरण श्रृंगारे , जिल्हा आरोग्य अधिकारी उस्मानाबाद नितीन बोडके, तहसीलदार तुळजापूर चंद्रकांत शिंदे, नोबल सुपर स्पेशलिटी डॉ. सुधीर शिंदे, वैद्यकीय अधिकारी उस्मानाबाद डॉ. स्मिता गवळी डॉ. वीरेंद्र गवळी, पोलीस निरीक्षक इंग्रजीत वर्धन उपस्थित राहणार आहेत . ते आपापल्या विभागाचे मार्गदर्शन उपस्थित धम्म बांधवांना करणार आहेत. भूम येथील होत असलेल्या राज्यस्तरीय धम्म परिषदेसाठी संयोजक समितीचे रघुनाथ सुकाळे , कांतलिंग थोरात, विनायक मस्के, दत्तात्रय पालखे, वसंत वाघमारे, मेघराज गायकवाड, प्रदीप चंदनशिवे, बापूराव सोनवणे, दत्तात्रय पाटोळे व आजी-माजी कर्मचारी परिश्रम घेत आहेत . भूम येथे दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८-३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रम होत असून धम्म चळवळीमध्ये काम करत असलेले कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत . धम्म परिषदेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.