दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई :-
या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ढाणे एन.एल. या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानसागर कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख सर व शाळेतील सहशिक्षक घोडके एन. ए. व भालके डी.पी. हे उपस्थित होते. कार्यक्रमास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली.यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा यांचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. दहावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून दोन White board भेट दिले. त्याचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर दहावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .व त्यानंतर प्रमुख पाहुणे देशमुख सर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चिकाटी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात चांगले आदर्श डोळ्यापुढे ठेवून वाटचाल केल्यास नक्कीच यश मिळेल याची खात्रीही त्यांनी दिली. यानंतर घोडके सर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शाळेच्या नावलौकिक वाढवावा अशी इच्छा व्यक्त केली. आणि विद्यार्थ्यांना जीवनात ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान केले. व कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका मॅडमनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व अध्यक्षीय समारोप केला. यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गायकवाड सर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावी वर्गातील विद्यार्थिनी कु. गिरीजा कांबळे व कु. साधना शेंडगे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले व सर्वांना अल्पोपहार देऊन निरोप देण्यात आला.