दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:- आष्टा येथील उद्योजक सचिन मुळे यांना रिसेल इन कंपनीकडून महाराष्ट्र उद्योग रत्न २०२३ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच उद्योजक अनिल शेळके यांची औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशी येथे आयएमसी समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संजय पवार, दत्ता नलावडे,अजीम मोमीन, बाळासाहेब गवळी,युनूस मोमीन, बाळू सुर्वे, पत्रकार बांधव अब्बास सय्यद,वसीम काजळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.