दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड (दि.२६)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदवीधर संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी डॉ. नरेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी डॉ. काळे यांच्यावर पदवीधर विभागाची जबाबदारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदवीधर संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे..
या निवडीबद्दल मराठवाडा विभागाचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी निवडीचे अभिनंदन केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट मध्ये पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी, डॉक्टर सेल व पक्षाच्या विविध जबाबदारी च्या पदावर प्रामाणिक पण केले आहे. या कामाची दखल घेऊन निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचे विचार सुशिक्षित वर्गात पोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, कोषाध्यक्ष मा. आ. हेमंत टकले, सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्यासह आदी पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले