दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार/सिरसी बु :- कंधार तालुक्यातील सिरसी बु येथील व्यंकटी जाधव मराठवाडा उपाध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांना सिरसी बु येथील ग्रामपंचायतीच्या रोजगार सेवकाच्या बापाची धमकी अडीच वर्षे जेल मध्ये टाकीन आणि पैसे वाटून निवडणूक लढविन असेल धमक तर पैसे वाटायची तयारी ठेवा आणि निवडणूक लढवा.आई बहिणीवर अश्लील शिव्या देऊन आमच्या नादाला लागू नकोस अन्यथा नाईलाजास्तव मला तुझ्या बंदोबस्त करावा लागेल.असे शिवाजी व्यंकटी कौसल्ये रोजगार सेवकाचा बाप यांनी फोन करून धमकावले आहे.ग्रामपंचायतचा कारभार रोजगार सेवकाचा बाप बघत असून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक काय करत आहेत हे शासनाने आम्हाला कळवावे.पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून द्या म्हटले म्हणून काय घाण शिव्या देत जेलमध्ये टाकण्याची धमकी देतात काय रोजगार सेवकाचा बाप झाला म्हणून काय लोकशाहीच्या विरूद्ध वागायचे असते काय आणि लोकशाहीचा चौथ्या स्तंभाला धमकी देऊन लोकांवर राज्य करता येते काय हे कोणत्या घटनेत लिहिले आहे ते सरकार मायबाप यांनी आम्हाला सांगावे. जे जनतेच्या समस्येवर महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांना धमकी देऊन गप्प बसण्यास सांगतात हा कुठला न्याय आहे असे सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी जाधव यांनी सांगितले आहे.त्यांनी अश्लील शिव्या दिलेली रेकॉर्ड आहे,शंभर टक्के पुनर्वसन झालेल्या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून देण्यात यावे म्हणून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिल्यामुळे हा प्रकार घडला आहे.