दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी-सुरेश जमदाडे
मुखेड,शहरात नगर परिषदेच्या वतिने कचरा व्यवस्थापन टेंडर देऊन सुद्धा कचरा घेण्यासाठी गाडी काही भागात येत नसल्याने कचरा तसाच राहुन त्या ठिकाणाहून दुर्गंधी येऊन मलेरिया सारख्या मोठ्या आजारांच्या लहाण मुलांवर व नागरिकांवर याच्या परिणाम होत आहे. याकडे त्वरित लक्ष केंद्रित करून हि समस्या मार्गी लावावी, अशा मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस मागासवर्गीय सेल संजय आडगुलवार यांनी निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
मुखेड शहरात रोज सकाळी कचरा घेण्यासाठी गाडी येऊन सुद्धा काही भागात येत नसल्याने कचरा तसाच राहुन त्या ठिकाणाहून दुर्गंधी येऊन मलेरिया सारख्या मोठ्या आजारांच्या लहाण मुलांवर व नागरिकांवर याच्या परिणाम होत आहे. तर या बाबत व्यवस्थापन कामगारांना विचारना केले अस्ता अरेवारीची भाषा करत आहे.
तसेच कचरा व्यावस्थापन करनारे टेंडरला नगर परिषदने समज द्यावे येथील नागरिक असे प्रशासनाविरुद्ध संतापलेल्या अवस्थेत दिसत आहे.
अशा बेजबाबदारपणे वागणाऱ्या कचरा टेंडर वाले शहरातील फुले नगर भागा सह विविध भागात होत असलेल्या समस्या नगर परिषदने त्वरित मार्गी लावावा अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशा अनेक मागण्यांचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस मागासवर्गीय सेल संजय आडगुलवार यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.