
दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी -मन्मथ भुस्से
अर्धापूर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी गुणवंत विरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी शंकरराव ढगे, प्रफुल्ल मोटरवार यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक पंडितराव लंगडे यांच्या संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या बैठकीला जिल्हा सरचिटणीस रुपेश पाडमुख, बापुसाहेब पाटील, निळकंठराव मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीत संघटनेच्या विस्तारासाठी सविस्तर चर्चा करुन नुतन कार्यकारणी घोषित करण्यात आली.या कार्यकारिणीला रुपेश पाडमुख यांनी मार्गदर्शन करुन येणाऱ्या काळात पत्रकारिते सोबत विधायक उपक्रम राबविण्याचा सल्ला दिला.तर तालुका पत्रकार संघाने गेल्या काही वर्षांत चांगले उपक्रम राबवुन एक आदर्श निर्माण केला आहे अशा भावना जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे यांनी व्यक्त केल्या .तर तालुका पत्रकार संघाचे काम उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन केले.
अर्धापूर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे.तालुकाध्यक्ष-गुणवंत विरकर, कार्याध्यक्ष- शेख शकिल, उपाध्यक्ष- शंकरराव ढगे, प्रफुल मोटरवार, सचिव उध्दवराव सरोदे, सहसचिव मुख्तारोदीन काझी, प्रसिद्धी प्रमुख-ॲड. गौरव सरोदे, कोषाध्यक्ष- व्यंकटी गोरे, सहकोषाध्यक्ष-शेख बशीर संघटक -आनंद मोरे, सल्लागार- लक्ष्मीकांत मुळे, निळकंठराव मदने, शेख मौलासाब,कार्यकारणी सदस्य- गजानन मेटकर, रमेश विरकर, आशिष पांडे, गोविंद राऊत, राजेश चौधरी, प्रशांत पांडे, मनोज मनपुर्वे या नुतन कार्यकारणीस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.