दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
°°°°°°°°°°°°^°°°°°°°^^^°°°°°^°°°°°°
आर्णी तालुक्यातील असलेल्या सावळी सदोबा परिसरातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा उमरी (कोपेश्वर)येथील एका शेतामध्ये रब्बी पीक हरभरा काढत असतांना हेडंबा मशीनमध्ये येऊन एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली,आज दुपारी ४:०० वाजता उमरी (कोपेश्वर)येथील शेतकरी राजू दादाराव काकडे यांच्या शेतामध्ये रब्बी पिक हरभरा काढत असताना शेतमजूर नामे विष्णू भिमा धुर्वे वय ५० वर्ष,गाव उमरी यांचा हेडंबा मशीनमध्ये येऊन मृत्यू झाल्याची घटना सावळी परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली,घटनास्थळावर परिसरातील हजारो लोकांनी गर्दी केली,घटनास्थळी पारवा पोलीस स्टेशन ठाणेदार यांनी घटनास्थळावर येऊन मृतकाला हेडंबा मशीनच्या बाहेर काढण्यात आले,सदर घटनास्थळाचा पंचनामा करून मृत्यूकाचा शव उत्तरीय तपासणीसाठी आर्णी येथे पाठविण्यात आले, मृतकाच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असून,घटनास्थळवर येतांच त्यांच्या
पत्नीने व मुलीने हंबरडा फोडला,