
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..
सत्यम शिवम् सुंदरम् चार संदेश देणारे श्री शिव महापुराण कथा आपल्याला नव्हेतर विश्वाला सुंदरता , शांतता इकडे तिकडे विश्वामध्ये कोठेच सापडत नाही.सुंदरता शांतता आपल्या मनामध्ये आपल्या मध्येच नाही तर कुठेही हुडकली तरी सापणारी नाही.सदाचाराचा श्रृंगाराने भक्ती सुंदर बनते.श्री.शिव पुराण आम्हाला शिकवणं देती की,आपण जेवढे इतरांना आनंद देऊ तेवढाच आनंद आपल्याला प्राप्त होणार जे पेराल तेच उगवेल.जो स्वतःला जाणू शकणार तो भगवान भोलेनाथ यांनाही जाणणारा यामुळे जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचे असेल तर श्री शिव पुराण कथा समजुन घेणे कथा केवळ ऐकण्यासाठी नव्हे तर कृती करण्याकरिता आहे.या वेळी मा.पालकमंत्री व आमदार बबनराव लोणीकर साहेब, मा.आमदार हरिभाऊ काका लहाने,ए.जे बोराडे,संदीप भैय्या गोरे,अंकुशराव अवचार, सुभाषराव घारे,राजेशजी मोरे,कैलास बापू बोराडे,सतिषराव निर्वळ, गणेशराव खवणे,पंजाबराव बोराडे,संतोष वरकड,सुरेशराव सरोदे,गणेशराव शहाणे,विष्णुपंत शहाणे,सर्जेराव बोराडे,गजानन बोराडे,श्रीरंग खरात,नागेश घारे,आनंद सोमाणी, दत्तप्रसाद झवर,लक्षिमन शिंदे,परमेश्वर उबाळे,शिवाजी कव्हळे ,विलास शिंदे,बाळासाहेब घारे,गणेश बोराडे,
गुरूचे महत्व जीवनामध्ये कोणी विसरू शकत नाही,पापामधून मुक्त होण्याचा मार्ग सर्वश्रेष्ठ गुरूकडेच सापडतो असे श्री शिव पुराण कथेच्या समारोपप्रसंगी नयना दीदी नाशिककर म्हणाल्या. एकत्रित राहण्याचा आदर शिव परिवारामध्ये आहे. शिव आदिशक्तीच्या पूजनाने जर यामध्ये विचार केला तर जगदंबा मातेचे वाहन सिंह, भगवान भोलेनाथाचे वाहन नंदी, गणपती बाप्पाचे वाहन उंदीर भगवान भोलेनाथाच्या गळ्यात साप, भगवान कार्तिकी चव्हाण मोर असा संपूर्ण परिवार आदर्श परिवार भगवान भोलेनाथ असून आदित्य शिवपूजनम ज्या घरात आईची सावली कृपा आहे त्या घरामध्ये गुरुचा वास असतो म्हणजेच शिवाचा वास असतो.
[साधु संत येती घरा तोच दिवाळी तोची दसरा साधू संतांमुळे आपला देश संबंध विश्वामध्ये एक आदर्श म्हणून उभा आहे. जे राजकीय पुढाऱ्यांनी आहे जमत नाही ते साधुसंत अमर…]
शिवपुराण कथेच्या महोत्सवाला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आभार…शेवटचा दिवशी काही गैरसोयी झाली असेल तर सर्वांची जाहीर क्षमा मागतो..हा आनंदाचा सोहळा संपन्न करण्यासाठी सर्व मित्र परिवार ,मार्गदर्शक, माता भगिनी,सर्व सहकारी यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहील सर्वांचे आभार मानत…..शिवसेना तालुकप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी मानले