
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा. गेल्या काही वर्षात शेतीची बहुतांश कामे शेतकरी ट्रॅकटर,रोटाव्हेटर, इतर यंत्राच्या सह्याने करु लागले आहे.त्यामुळे गुराढोरांची विशेष गरज भासत नसलयाचे दिसत आहे.परिणामी, शेणखताच्या उत्पादन क्षमतेत घट झाली असूनगतवर्षीच्या तुलनेत या वर्षी खताचे ट्रॉलीमागील दर हजाराने वाढून 3 हजारांवर पोहोचले आहे. मात्र इतके पैसे मोजूनही आणि ‘डिमांड’ अधिक असूनही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हे खत मिळत नसल्याचे एकूण चित्र निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षात शेतामध्ये रासायनिक खताचा बेसुमार वापरझालयाने जमिनीचा पोत बिघडून उत्पादनावर परिणाम असून मानवी जीवनाला ते अपाय कारक ठरू लागले आहे