दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा- मुलांनी अभ्यासाबरोबर महापूरुषांची चरित्रे वाचली पाहीजेत असे प्रतिपादन स्वच्छता दूत तथा सहशिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल लोहा यांनी शहरातील पवार कोचिंग क्लासेसच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात (ता.24) रोजी बोलतांना केले.
व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोती कदम, प्रमुख पाहुणे म्हणून ऊद्धवराव डिकळे, रंगनाथ पोशट, राजु सावकार पारसेवार, क्लासेसचे संचालक प्रा. प्रभाकर पवार आदिंची ऊपस्थिती होती. पुढे बोलतांना श्री. तिडके म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचा, गावाचा परिसर स्वच्छ करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय ठेऊन ते प्राप्त करण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. अभ्यासा बरोबर व्यायामालाही प्राधान्य दिले पाहिजे. जेनेकरून लहान सहान आजार होणार नाहीत. असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवार कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. प्रभाकर पवार यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोती कदम सर, संतोष चमकुरे सर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानोबा कराळे सर यांनी तर आभार सृष्टी मोरे या विद्यार्थिंनीने मानले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.