
कोल्हापूर स्थानिक स्वराज्य विधानपरिषद निवडणुकीसाठी चार अर्ज ठरले वैद्य तसेच सतेज पाटील व महाडिक गटात शाब्दिक चकमक
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
कोल्हापूर विधान परिषद साठी 7 अर्ज दाखल होते त्यापैकी खरी लढत ही सतेज उर्फ बंटी पाटील काँग्रेस व अमल महाडिक भाजप यांच्यात होणार आहे आज अर्ज छाननी होती या छावणीत महाडिक व पाटील जमावबंदीचा आदेश देऊन सुद्धा दोन गट आमने सामने आले व यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती दोन्ही गटातल्या आपापल्या नेत्याच्या नावाने घोषणाबाजी कार्यकर्ते देत होते याच वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना तिथून हुसकावून लावले आहे या भागात दोन्ही गटाचे मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते आले होते या दोन्ही गटात किती चुरस आहे हे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिसून आले तसेच काल चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस महाविकासआघाडी कडून चांगला प्रस्ताव आल्यास विधान परिषदेच्या सहा ही जागा बिनविरोध करण्याची आमची भाजपची तयारी आहे असे काल दादांनी पत्रकार परिषद ला माहिती दिली होती आज त्याच्या उलट चित्र कोल्हापूरमध्ये आपल्याला पहावयास मिळाले आज दोन्ही गट आमने सामने आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आज छाननीत चार अर्ज वैध ठरले आहे यामध्ये,यामध्ये काँग्रेसकडून गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांचा अर्ज वैद्य ठरला . तर भाजपकडून प्रतिस्पर्धी माजी आमदार अमल महाडिक यांचा अर्ज वैद्य ठरला . या व्यतिरिक्त शशिकांत खोत आणि शौमिका महाडिक या अपक्षांचा अर्ज वैद्य ठरला आहे .