दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी -विष्णु मोहन पोले
अहमद्पुर:
शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने
मौजे धानोरा(बु) येथे दि.18/02/2023 रोजी आंतरशालेय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात वसंत विद्यालय धानोरा बु येथे इयत्ता 9 वी मध्ये शिकणारी कू. तनाज नय्युम शेख हिने प्रथम पारितोषिक पटकावले यात रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने मौजे मानखेड ता.अहमदपूर येथे दि.25/02/2023 रोजी आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय पारितोषिक मिळविले यात रुपये 5000/- एवढी रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
या यशाबद्दल कु. तनाज चे पालक, शिक्षक, गावकरी यांनी अभिनंदन केले आहे व सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.