
दैनिक चालु वार्ता सांगोला तालुका प्रतिनीधी -जगन्नाथ साठे
मिलिंद जोशी,प्रकाश पायगुडे,श्रीकांत मोरे,प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते ५ मार्च रोजी वितरण
: इसबावी, पंढरपूर येथील डॉ. द.ता. भोसले सार्वजनिक वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था पंढरपूर यांच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय डॉ.द.ता.भोसले जिव्हाळा साहित्य व साहित्यसेवा पुरस्कार दिले जातात. मागील तीन वर्षे कोविड-१९ मुळे हे पुरस्कार देता आले नाहीत.तो पुरस्कार वितरण समारंभ या वर्षी संपन्न होत आहे.या सर्व पुरस्कारांची घोषणा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले,वाचनालयाचे अध्यक्ष कल्याणराव शिंदे व जिव्हाळा परिवाराचे अध्यक्ष ॲड.भारत भोसले यांचे उपस्थितीत निवड समिती सदस्य डॉ.रमेश शिंदे ,प्रा.भास्कर बंगाळे,प्रा.धनाजी चव्हाण यांनी केली आहे.
साहित्य सेवेसाठी तीन व साहित्यामध्ये कथा, कादंबरी कवितासंग्रह, ललित गद्य व बालसाहित्य या साहित्य प्रकारासाठी प्रत्येकी तीन असे एकूण १५ पुरस्कार दिले जाणार आहेत, त्यामध्ये साहित्य सेवेसाठी सौ.सुनीताराजे पवार संस्कृती प्रकाशन पुणे, डॉ.राजेंद्र दास ज्येष्ठ साहित्यिक, प्रसिद्ध वक्ते, श्री.प्रकाश जडे ज्येष्ठ साहित्यिक, अध्यक्ष म.सा.प. दामाजी नगर मंगळवेढा, साहित्य पुरस्कारासाठी साहित्य प्रकार कथासंग्रह – हरवलेल्या कथेच्या शोधात-सिताराम सावंत,इटकी सांगोला, शिरवाळ-हरिश्चंद्र पाटील टेंभुर्णी, हावळा -गणपत जाधव अकलूज, कादंबरी- महायोद्धा- गोविंद काळे, सोलापूर ,ज्ञानमंदिरातील नंदादीप- शिवाजीराव बागल,पंढरपूर, लॉकडाऊन – ज्ञानेश्वर जाधव, बार्शी, कवितासंग्रह डोहतळ- मारुती कटकधोंड,सोलापूर,नाही गिरवता येत कुठलीच लिपी -डॉ.स्मिता पाटील मोहोळ,उसवायचाय तुझा पाषाण- कविता मुरूमकर ,सोलापूर , ललित गद्य व बालसाहित्य साहित्य पत्रकारिता शोध आणि बोध- सचिन वायकुळे बार्शी, आईस्क्रीमचं तळं -रमेश वंसकर,गोवा, गावपण शोधताना – सुनील जंवजाळ ,चोपडी सांगोला यांना जाहीर झाले आहेत.
या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र,
असे आहे. दि.५ मार्च २०२३ रोजी दुपारी ०१.३० वाजता संत संतराज महाराज मठ इसबावी, पंढरपूर ‘या ठिकाणी म.सा.प.पुणे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत ,मनोरमा साहित्य मंडळीचे अध्यक्ष श्रीकांत मोरे, म.सा.प. सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या शुभहस्ते, डॉ. द.ता. भोसले ज्येष्ठ साहित्यिक यांचे अध्यक्षतेखाली व मा.कल्याणराव काळे चेअरमन सहकार शिरोमणी सह.साखर कारखाना भाळवणी ,मा.अभिजीत पाटील चेअरमन वि.सह.साखर कारखाना वेणूनगर, भगीरथ भालके माजी चेअरमन विठ्ठल सह. साखर कारखाना वेणूनगर, मा.वसंतनाना देशमुख जिल्हा परिषद सदस्य, प्रकाश पाटील चेअरमन सु.रा परिचारक पतसंस्था, प्रणव परिचारक सरपंच खर्डी,नागेशकाका भोसले चेअरमन मर्चंड बँक पंढरपूर, युवराज पाटील अध्यक्ष विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूर प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.तसेच म.सा.प.पुणे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी, मुख्याध्यापक/ केंद्रप्रमुख चळे मा. कल्याणराव शिंदे सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ‘कल्याणमस्तु’ ! (संस्कृती प्रकाशन, पुणे ) कल्याणराव शिंदे सेवापूर्ती गौरव ग्रंथ प्रकाशन समारंभ व सेवापूर्तीनिमित्त कल्याणराव शिंदे सर यांचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.अशी माहिती ॲड भारत भोसले, प्रा.धनाजी चव्हाण, समाधान मलपे यांनी दिली आहे.