
दैनिक चालु वार्ता अहमदपूर तालूका प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
(दिव्यांग व्यक्तींना विशेष कायदे विषयक मा.न्यायाधीश आशिष साबळे यांचे मार्गदर्शन)
==========================
लातूर/अहमदपूर:- दि.२८/०२/२०२३ रोजी जागतिक सामाजिक न्याय दिवस निम्मित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.न्यायाधीश ए.जी साबळे सह दिवाणी न्यायाधीश स्तर अहमदपुर, यांनी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर प्रमुख पाहुणे मा. ऑड.व्ही.एम उच्चे विधीज्ञ अहमदपुर, मा. ऑड.आर.आर वाघमारे विधीज्ञ अहमदपुर,यांनी जागतिक सामाजिक न्याय दिन निम्मित कायदेविषयक मार्गदर्शन केले.त्याच बरोबर विकास कराड न्यायालयीन लिपिक,जाधव परशुराम, न्यायालयीन कर्मचारी मा.पवार साहेब जागतिक सामाजिक न्याय दिवस दिनाच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालय आणि श्री पांडुरंग मूकबधिर विद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आयोजित कायदा विषयक शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. दिव्यांगाच्या जीवनावर प्रकाश टाकणारी मार्गदर्शनपर अशा स्वरूपाची भाषणे झाली. कार्यक्रमाचा शुभारंभ हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव मा विकास तपशाळे यांनी सूत्रसंचलन अश्रूदादा सुपे यांनी केले व आभार मुख्याध्यापक दत्तू बिरादार सर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक सुपे सर, ज्ञानोबा चिमले, संतोष हालणे, रितपुरे सर, आगलावे सर,वाघमारे सर, शिरीष पाटील,संजू पाटील, मेश्राम सर,वानखेडे सर, योगिता पवार, चांगुना कांबळे,पाटील मॅडम, मुळे मॅडम, यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.