
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा तालुक्यातील मौजे पिंपळदरी येथील सरपंच प्रतिनिधी संतोष देवराव जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड व गटविकास अधिकारी पंचायत समिती लोहा यांना निवेदन देऊन सहाय्यक लेखा अधिकारी एस.एस.गुंडावार हे कार्यालयात रजा न देता किंवा वरीष्ठांना कसलीही सुचना न देता कार्यालयात गैरहजर राहतात.अनेक वेळा फोन केला तर फोन उचलून बोलत नाहीत किंवा फोन बंद करून ठेवतात.पिंपळदरी ते लोहा अंतर ६० किमी अंतरावर आहे.येणे जाणे परवडत नाही.गटविकास अधिकारी साहेब यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ते रजा न देता किंवा सूचना न देता .कार्यालयात दांडी मारत आहेत.असभ्य वर्तन करतात अश्लील भाषेत बोलतात गुराखी लोकांसारखे वागतात.त्यांच्या मनावर येऊ वाटेल तेव्हा येतात जाऊ वाटले की निघून जातात . तेव्हा गटविकास अधिकारी पंचायत समिती लोहा व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी माझ्या निवेदनाचा विचार करून योग्य ती कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मला माझ्या कामाला वैतागून लोकशाहीचा मार्गाने आमरण उपोषणाला बसावे लागेल असा सरपंच प्रतिनिधी संतोष पाटील जाधव पिंपळदरीकर यांनी इशारा दिला आहे.