
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार तालुक्यातील कळका येथील पद्मीनबाई माधवराव गायकवाड यांच्याकडे नमुना नंबर आठ ०१/१०/२००८ रोजी देण्यात आला असून त्यांना आतापर्यंत घर नावाने केले नाही.सरपंच, ग्रामसेवक यांच्या सहीने नमुना नंबर आठ देऊन सुद्धा घर नावाने कसे झाले नाही.मला नावाने करून देण्यात यावे अन्यथा नाईलाजास्तव मला लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा पद्मीनबाई माधवराव गायकवाड यांनी ग्रामविकास अधिकारी यांना दिला आहे.