
दै.चालू वार्ता प्रतिनिधी नांदेड बाजीराव गायकवाड
पुणे:-दिनांक 24 नोव्हेंबर रोजी “भारतमाता महिला मंडळ भाजपा युवती आघाडीच्या वतीने सहकारनगर #पुणे येथे महिलांसाठी (कॅन्सर स्क्रिनिंग) आयोजित आरोग्य शिबीराचे उद्घाटन सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक महिला आपल्या संपूर्ण परिवाराची काळजी घेत असताना तिचे स्वतःकडे दुर्लक्ष होते, यामुळे रोजच्या या धकाधकीच्या जीवनात अनेक महिला विविध आजारांनी ग्रासलेल्या आहेत. या सगळ्याचा विचार करता महिलांसाठी आरोग्य (कॅन्सर स्क्रिनिंग) शिबिराचे आयोजन केले होते या वेळेस “प्रयास संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर स्क्रिनिंग करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेत्री संयोगिता भावे, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका साईदिशा माने, माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका सरस्वतीबाई शेंडगे, ना. म. जोशी, उत्तराताई सामंत, नगरसेवक महेश वाबळे सह युवती मोर्चाच्या पदाधिकारी व महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. या शिबिराचे आयोजन सौ. प्रियांका शेंडगे- शिंदे भाजपा (सरचिटणीस) युवती आघाडी पुणे शहर यांच्यावतीने करण्यात आले होते.