दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील धावरी येथे दरवर्षी यावर्षी पण छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. शिवजयंतीमध्ये
दि.24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित केले होते. यामध्ये प्रमुख वक्ते राम पाटील जामगे व बाल व्याख्यात्या प्रिया पाटील यांनी आजचा युवक , बेरोजगारी , शिवराय कोण होते शिवरायांची शिकवण , आपली संस्कृती यावर तारूणांना नवचेतना मिळावी यासाठी मोलाचे व्याख्यान केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन शिवमुद्रा जनकल्याण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदाजी पा इंगळे यांनी केले. दि.25 फेब्रुवारी रोजी शिवरायांच्या पुतळ्याची पालखीसह पारंपारिक पध्दतीने गावातील मुख्य रस्त्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावरी येथील विशेष लेझीम पथक घोड्याचे नृत्य , वारकरी पथाका , झेंडा पथक, लहान मुलींच्या माथ्यावर रंगीबेरंगी कळस यासह पारंपरिक आकर्षक देखावे करण्यात आले होते.
छत्रपती शिवरायांची पालखी मधून मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील पालखी मार्गात येणाऱ्या प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून आकर्षक देखावे करत उपस्थितांचे लक्ष वेधले. जयंतीमध्ये गावातील सर्व तरुण , जेष्ठ मंडळी वयोवृद्ध ,बांधवांनी सहभाग घेतला तसेच गावातील लहान लहान बालकांनी शिवकालीन वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे व शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते.
या जयंतीसाठी शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील वाकडे सह गावातील जेष्ठ नागरिक सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले वर्चस्व पणाला लावून हा शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शिवरायांच्या जयघोषात संपन्न केला.