दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर; देगलूर तालुक्यातील मौजे माळेगाव (मक्ता) (महाराष्ट्र)ते चंडेगाव माधापूर (तेलंगणा) च्या गावांमधील 33 फुटाचा शिव व पानदान रस्ता होता.
तो तेथील शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून तो रस्ता बंद केल्यामुळे गावकऱ्याचे त्या भागात ज्यांचे शेती आहेत त्या शेतकऱ्यांना शेती अवजारे व खत बी बियाणे बैल जोडी आपली जनावरे घेऊन जाता येत नाही पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टर सुद्धा घेऊन जाता येत नाही कारण रस्ता नाही.
त्यामुळे वास्तविक परिस्थितीचा आपल्या कार्यालयाकडून सर्वे करून नारायण खुणेवाढ ते नागनाथ बालन्ना कोणतीवार यांच्या शेतापर्यंत शिव व पानदान रस्ता शासनाकडून त्वरित मंजूर करून द्यावा. व शेतकऱ्यांच्या होणाऱ्या हाल अपेष्टेचा विचार करून अडचणी दूर करावेत अशा आशयाचे निवेदन मौजे मळेगाव मक्ता येथील समस्त शेतकरी व गावकरी मंडळींनी तहसील कार्यालय देगलूर, व उपविभागीय कार्यालय देगलूर यांना निवेदन देऊन विनंती केले आहे.