दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:आंध्र प्रदेश, कर्नाटक सिमेवर असलेल्या देगलूर तालुक्यामध्ये गुटखा बंदीचा पुर्ण बोजवारा उडाला असून सर्रास देगलूर शहरामध्ये हार पान टपरीवर हार किराणा दुकानांमध्ये व चहाच्या टपरीवर गुटखा बेधडक विक्री होत असताना दिसत आहे गुटख्याची विक्री करण्यात येत आहे. विशेषतः सिमेपलि कडून गुटख्याची देगलूर शहर व तालुक्यात मोठ्या
प्रमाणात गुटख्याची आयात होत आहे. पोलिस आणि अन्य औषध व प्रशासन विभाग हे मात्र या गुटखा विक्री व गुटखा आणणाऱ्या व्यक्तीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का हे कुठेतरी देगलूर जनतेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे . देगलूर शहरात या गुटख्याची साठवणूक करून खेड्यापाड्यां मध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. तिरी याकडे संबंधीत अधिकाऱ्यांनी घालून देगलूर व देगलूर परिसरातील नवयुकांचे आरोग्य कसे निरोगी राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे .