
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
देगलूर( दि.०१) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नावाने बनावट लेटरपॅड बनविणाऱ्यावर कडक कार्यवाही व्हावी यासाठी देगलूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने देगलूर उपविभागीय अधिकारी व पोलीस ठाणे देगलूर येथील पोलीस निरिक्षक यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी देगलूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्मीकांत पदमवार,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालूका प्रमुख महेश पाटील,माजी सभापती माधवराव मिसाळे,रामराव नाईक, शंकर कंतेवार,दिनेश मुनगिलवार, विधानसभा युवक अध्यक्ष जनार्धन बिरादार,युवा शिवसेना जिल्हा सरचिटणीस धनाजी जोशी, युवा सेना तालुकाध्यक्ष संतोष जाधव, युवासेना तालूका समन्वयक सोशल मीडिया तालूका प्रमुख भागवत पाटील सोमूरकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुमीत कांबळे,नाना मोरे,शशांक पाटील मुजळगेकर,ताराकांत पाटील, सदाशिव शिंदे,शिवकुमार डाकोरे, माजी नगरसेवक सुशीलकुमार देगलूरकर,सरपंच प्रशांत पाटील, धनाजी जोशी,भरत पाटील, महेश पाटील गवंडगावकर, अमित बोल्नावर, कपिल देशमुख, रोहित कंतेवार, विनायक पोतदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.