दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/आष्टी— आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि इतर मागण्यांसाठी बीड जिल्ह्याधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदारसंघातील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत विविध मागण्यांसाठी आ. सुरेश धस यांनी बैठक घेत संबंधित यंत्रणेला रखडलेले कामे मार्गी लावण्यासाठी आदेशित करावे अशी विनंती केली.
आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघातील
पांगरी (जाधववाडी) साठवण तलाव, आष्टी तालुक्यातील कुंटेफळ साठवण तलावाच्या कामाला गती मिळणे, गहुखेल साठवण तलावाच्या उर्वरीत कामाची स्थिती, भिलारवाडी जाटनांदूर ता. शिरूर कासार येथील शेतकऱ्यांना रेल्वेसाठी भूसंपादित केलेले जमिनीचा मोबदला मिळण्याबाबत. शिरूर का. तालुक्यातील उखळवाडी साठवण तलावाच्या कामाबाबत, सिंदफणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढवणेया कामात गती मिळण्याबाबत पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटोदा व शिरुर का. तालुक्यातील रखडलेल्या कामांची तातडीने सुरुवात तातडीने सुरुवात करावी यासोबतच अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान व विमा वाटप करावा या मागण्यासाठी संबंधित यंत्रणेला तात्काळ आदेशीत करून रखडलेली कामे पुर्ण करावेत व जमीन भूसंपादनाची कामे व मावेजा तात्काळ मार्गी लागतील यासाठी प्रयत्न करून मतदारसंघात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदाना बाबतीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी, शेतकऱ्यांच्या बँक खाते व आधार प्रामाणिकरण बाबतीतील त्रूटी दुरुस्त करून तात्काळ अनुदान वाटप व्हावे अशी आग्रही मागणी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, महसूल प्रशासन, कृषी विभागाचे अधिकारी, मोजणी व भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व संबंधित गावचे शेतकरी व प्रकल्पस्त उपस्थित होने