दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
परीक्षार्थी मुलांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत
देगलूर:ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूल रामपूर रोड देगलूर आज परीक्षा केंद्र क्रमांक 51 10 आज माध्यमिक शाळा परीक्षेचा पहिला दिवस निमित्य परीक्षार्थींना पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढ व्हावे व कॉपीमुक्त अभियानास पोषक असे वातावरण प्राप्त व्हावे यासाठी म्हणून आज केंद्रामध्ये देगलूर तालुक्याचे माननीय गटशिक्षणाधिकारी साहेब श्री पंजाबराव जी सूर्यवंशी सर हे उपस्थित होते यावेळी केंद्रप्रमुख तथा प्राचार्य राजाराम पागेकर वैदेही पागेकर व परीक्षार्थी सोबत पालकही उपस्थित होते परीक्षेची परीक्षा केंद्रात विद्यार्थी आल्यावर प्रथमतः राष्ट्रगीत घेऊन विद्यार्थ्यांना हॉलमध्ये सोडण्यात आले सर्व शाळेतील शिक्षक वर्गांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.