दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
पोटनिवडणुकीत विजयाबद्दल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाके फोडत जल्लोष साजरा केला
भूम:- पुणे येथील कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कडून काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाबद्दल शहरातील गोलाई चौक येथे महाविकास आघाडी भूम च्या वतीने फटाके फोडत,पेढे वाटून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष एडवोकेट श्रीनिवास जाधवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश मस्कर, काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष सिराज मोगल ,शिवसेना विधानसभा प्रमुख प्रल्हाद आढागळे, प्रियदर्शनी काँग्रेसच्या अमृता गाढवे ,परंडा विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोईज सय्यद ,युवक काँग्रेस शहराध्यक्ष राजू साठे ,ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रभाकर डोंबाळे ,काँग्रेस तालुका उपाध्यक्ष ऍड घनश्याम लावंड ,अल्पसंख्यांक विभागाचे बाशा शेख, किसान काँग्रेसचे राम सावंत, राम वारे ,शिवसेनेचे रामभाऊ नाईकवाडी, एकबाल पठाण, महादेव जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.