
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (दर्यापूर) :- माझी वसुंधरा ३.० व स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ अंतर्गत स्वच्छता महोत्सव दि. ९ फेब्रुवारी २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत नगर परिषद दर्यापूर द्वारा आयोजित करण्यात आले होते.यामध्ये अमरावती विभागातील सर्व नगर परिषद चे अधिकारी,कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
या सांस्कृतिक कार्यक्रममध्ये नृत्य व संगीत सादर करताना स्पर्धक व विजेत्यांचे नावे नृत्य स्पर्धा (सोलो) विजेते प्रथम क्रमांक राहुल सावंत (न.प.कारंजा),द्वितीय क्रमांक शुभम कनोजे (न.प.वाशिम),तृतीय क्रमांक अमित समुद्रे (न.प.अंजनगाव सुर्जी) नृत्य स्पर्धा (ग्रूप) विजेते प्रथम क्रमांक नगर परिषद वरूड,द्वितीय क्रमांक आयुक्त कार्यालय अमरावती,तृतीय क्रमांक न.प.खामगाव, तर गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शब्बीर बेग,द्वितीय क्रमांक जयेश खरात,तृतीय क्रमांक संजय अठवाल.