दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड –कामावर येणाऱ्या जेसीबीच्या खोयाखाली घ्या असे म्हणणाऱ्या शाखा अभियंता मुजाहिद सय्यद यास तात्काळ निलंबित करावे यासाठी जागीरमोहा येथील ग्रामस्थांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. अभियंत्याने ग्रामस्थां बरोबर केलेल्या वर्तनाबद्दल तालुक्यात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तालुक्यातील जहागीरमोहा येथे धनगर वस्ती या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु असताना शाखा अभियंता मुजाहिद सय्यद याने चांगले काम करावे अशी मागणी करणाऱ्या ग्रामस्थांना जेसीबी खाली घ्या मी पोलीस ठाण्याचे बघून घेतो अशी धमकी दिली होती. या प्रकरणावरून ग्रामस्थ संतप्त झाले होते. ग्रामस्थांनी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच धारूर पोलीस ठाण्यामध्ये ही अभियंत्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंतर मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची ग्रामस्थांनी भेट घेऊन शाखा अभियंता यास निलंबित करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. याच बरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव साळुंके यांनाही निवेदन देण्यात आले.