दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड दक्षिणची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यात युवा आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी कंधार तालुक्यातील लाठ ( खुर्द ) येथील सौरभ राजू पवार यांची निवड करण्यात आली आहे.( वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्येय नेते बाळासाहेब आंबेडकर ) ,मा.निलेश विश्वकर्मा (प्रदेशाध्यक्ष वं.ब.युवाआघाडी ),राजेंद्र दादा पातोडे ( प्रदेश महासचिव वं. ब.युवा आघाडी ),अक्षय भाऊ बनसोडे ( प्रदेश सदस्य )शिवा भाऊ नरंगले ( जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ) यांनी सौरभ यांच्या कामाची दखल घेवून नांदेड दक्षिण जिल्हा युवा आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सदरच्या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत करण्यात तेत आहे.या कार्यकारिणीची घोषणा युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केली असून वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बांधनी तसेच पक्षवाढीच्या उद्देशाने जिल्ह्यातील तरून कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकली यामध्ये कंधार तालुक्यातील लाठ (खुर्द ) येथील तरूण कार्यकर्ता सौरभ पवार यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात ली आहे.त्याच्या निवडीबद्दल अक्षय भाऊ बनसोडे ( प्रदेश सदस्य वं.ब.युवा आघाडी ),वैभव लष्करे ( महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी दक्षिण नांदेड ),गोपालसिंघ टाक ( महानगर अध्यक्ष नांदेड दक्षिण ),सिद्धोधन कापसीकर ( महानगर महासचिव नांदेड दक्षिण ) यांनी निवड झाल्याबद्दल पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या .