दैनिक चालू वार्ता लातूर जिल्हा उपसंपादक -प्रा मारोती बुद्रुक पाटील
येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी ज्ञानेश्वरी रमेश सूर्यवंशी वर्ग चौथा ही सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मानखेड आयोजित जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत प्राथमिक गटात सर्वप्रथम आली असून 5000 रुपयांचे रोख पारितोषक तर माही विलास सांगुळे जिल्ह्यात तृतीय आली असून दीड हजार रूपये सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून सरपंच प्रफुल्लाताई नारागुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सुभाषराव भिकाणे, पुरुषोत्तम माने, बालाजी तुरेवाले, राम तत्तापुरे, आशा रोडगे, उपसरपंच प्रवीण कांबळे, रवी पाटील, प्रा. शुभ्रकांत गुंडरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, सचिव तथा प्राचार्या रेखाताई तरडे ,मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.