दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..शहर व तालुक्यातील आठ परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीची शालांत प्रमाणपत्र परीक्षा आज ता. दोन रोजी सुरळीत सुरु झाली असून परीक्षेला मराठी माध्यमाचे एक हजार नऊशे पंच्यांशी तर उर्दू माध्यमाचे सत्तावन्न विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांनी दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला मंठा (मराठी 139 व उर्दू 17), स्वामी विवेकानंद विद्यालय मंठा (मराठी 381 व उर्दू 10), रेणुका विद्या मंदिर मंठा (मराठी 244 व उर्दू 6), छत्रपती संभाजी राजे विद्यालय हेलस ( मराठी 224 व उर्दू 24) शंभू महादेव विद्या मंदिर वाटूर 426, लाल बहादूर शास्त्री विद्यालय उस्वद 170, जिल्हा परिषद प्रशाला तळणी 231, सिद्धेश्वर विद्या मंदिर ढोकसाळ 168 याप्रमाणे विद्यार्थी परीक्षेस सामोरे जात असून तालुक्यता कॉपिमुक्त अभियान जोरदारपणे राबविले जात आहे.
गट विकास अधिकारी बाबासाहेब थोरात तसेच तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचारी यांची बैठे पथके तसेच भरारी पथके स्थापन करण्यात आलेली असून गट शिक्षणाधिकारी अशोक सोळंके हे पथक प्रमुख असून गट समन्वयक के. जी. राठोड यांची सहाय्यक पथक प्रमुख म्हणून नियुक्त केले आहेत. आज पहिल्याच मातृभाषेच्या पेपरला सर्व परीक्षा केंद्रांना पथकांनी नियोजनाप्रमाणे भेटी दिल्या.
पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सर्वच परीक्षा केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे परीक्षा केंद्राच्या बाहेर गर्दी दिसून आली नाही मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या दहावी बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी सतीश शिंदे यांची परीरक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या देखरेखीखाली नेमलेले पथक चोख कामगिरी बजावत आहे.
जिल्हा परिषद प्रशाला मंठाचे केंद्रसंचालक नेताजी चौधरी तसेच स्वामी विवेकानंद विद्यालय मंठाचे केंद्रसंचालक के. आर. ताठे यांनी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या चोख व्यवस्था व बंदोबस्तामुळे आम्हाला परीक्षा सुरळीत पार पाडण्यास सहाय्य होत आहे अशी प्रतिक्रिया दिली.