
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त ‘जागर मराठी भाषेचा’ या कार्यक्रमाचे आयोजन कळंब पत्रकार संघ व वेद शैक्षणिक संकुल, मराठी साहित्य शिलेदार मंच कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस वृक्षारोपण करण्यात आले.तर कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पत्रकार संघाचे अध्यक्ष . अशोक शिंदे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. तुषार वाघमारे, व प्रमुख उपस्थिती माधवसिंह राजपूत, शितलकुमार धोंगडे, ओंकार कुलकर्णी ,सतीश टोणगे,बालाजी आडसुळ,प्राचार्य सतीश मातने उपस्थित होते.
यावेळी तुषार वाघमारे यांनी मार्गदर्शन केले व एक कविता सादर करतांना म्हणतात..
‘माझं मरण येताना ते अचानक यावा
लाखोंच्या गर्दीत मी पंचतत्वात मिलिन व्हावा’.
जागर मराठी भाषेचा या कवी संमेलनासाठी कवी म्हणून प्रसिद्ध गझलकार शेखर गिरी, सोपान पवार, संतोष लिमकर, हनुमंत माने, दादाराव गुंडरे, सचिन शिरसागर, बालाजी अडसूळ, माधवशिंग राजपूत, अशोक शिंदे, सतीश मातने, अविनाश घोडके, विनोद जाधव या मान्यवरांनी कविता सादर केल्या.
शेखर गिरी यांनी सात वाजल्यानंतर ही गझल सादर करून हास्य पिकवले.
आश्रुबा कोठावळे यांनी ‘ प्रेमामध्ये असंच चालायच ‘ ही प्रेमकविता सादर केली.
कवी संतोष लिमकर यांनी कविता सादर करतांना
विचार कधीच मरत नसतात
असे माणसे मारल्यावर नाही तर, गांधी कधीच दिसले नसते ,
भारताच्या चलनावर, अशी विज्ञानवादी कविता सादर केली.
सोपान पवार यांनी पावसावर कविता सादर केली.तसेच हनुमंत माने यांनी ” बायको अशीच असते ” ही कविता ऐकवून टाळ्या मिळवल्या.दादाराव गुंडरे यानी ” शेतकरी बाप ” ही कविता सादर केली.
कवी संमेलनाचे सूत्रसंचलन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कळंब तालुका अध्यक्ष कवी आश्रुबा कोठावळे यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार सतीश टोणगे यांनी मानले.
या कार्यक्रमाला वेद शैक्षणिक संकुल चे सर्व कर्मचारी,पत्रकार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.