
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मुखेड प्रतिनिधी – शिवकुमार बिरादार
मुखेड दि . २ मुखेड पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांची बदली झाल्यानंतर त्याजागी पोलीस निरीक्षक रमेश चिमाजी वाघ हे रुजू झाले. त्यांनी मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून नव्याने पदभार स्विकारला असून ते कार्यरत झाले आहेत. नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांचे विविध पक्ष कार्यकर्ते व पत्रकार यांच्याकडून उत्साहात स्वागत होत आहे .
तालुक्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात यशस्वी होतील अशा प्रकारची अपेक्षा पत्रकार बांधव व्यक्त करीत आहेत.
रमेश वाघ यांनी मुंबई सारख्या महाशहराच्या ठिकाणी सिनियर पोलीस निरीक्षक म्हणून २७ वर्ष प्रामाणिक सेवा केली असून नांदेड जिल्ह्यात ते प्रथमच मुखेड पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. मुखेड येथे रुजू होताच पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांचे दै. समीक्षा पेपरचे पत्रकार जगदीश जोगदंड, दै. चालू वार्ता चे तालुका प्रतिनिधी सुरेश जमदाडे व (ग्रा) तालुका प्रतिनिधी शिवकुमार बिरादार तसेच tv सह्याद्री न्युजचे मुखेड तालुका प्रतिनिधी विठ्ठल पाटील, दैनिक युवा मराठा पेपरचे पत्रकार मनोज बिरादार, संग्राम पाटील, यांनी पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला आहे.