दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी – सुरेश जमदाडे
बरबडा बरबडा येथे केंद्र शासनाकडून ई श्रम कार्ड व आभा कार्ड नोंदणी आठवड्यापासुन ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ ईश्रम कार्ड महानोंदणी अभियान सुरु केली आहेत. त्यामध्ये जवळपास ५०० लोकांचे कार्ड काढून देण्यात आले. त्या कार्ड चे वाटप जिल्हा परिषद सदस्या पुनमताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी बरबडा नगरीचे सरपंच माधव कोलगाणे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी घोसलवाड, ग्रा.पं.सदस्या अर्चना रुद्रवाड, ग्रा.पं.
सदस्या दुर्गाताई जेटेवाड, भारतबाई कोलगाने, माजी ग्रा. पं. सदस्य बालाजी जंगीलवाड, संगणक परिचालक किरण हनमंते, ज्ञानेश्वर घोडेकर, आशा वर्कर पर्यवेक्षिका अर्चना चुनुकवाड, आशा वर्कर मुक्ताताई वानखेडे, अंजना जंगलीवाड पार्वतीबाई हनमंते आदींची उपस्थिती होती.
सुरुवातीस जिल्हा परिषद सदस्या पुनमताई पवार यांचा सत्कार सरपंच प्रतिनिधी भारतबाई कोलगाने, आशा वर्कर मुक्ताताई वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर सर्व आशा वर्कर यांचा सत्कार पुनमताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला. पुनमताई पवार यांनी कार्ड धारकांना
मार्गदर्शन केले. त्यांनी ई श्रम कार्ड व कार्ड काढणे का गरजेचे आहे हे सांगितले आणि त्यांचा फायदा समजावून सांगितले. असंघटित क्षेत्रातील कामगारांना सुरक्षा व कल्याणकारी योजनाचा लाभ नोंदणी नंतर अपघाती मृत्यू, कायमचे अपंगत्व झाल्यास २ लाख रुपये हे फायदे आहेत. ईश्रम चे आणि आभा कार्डचे उद्देश म्हणुन श्रमिकांना कौशल्य विकास व रोजगार संधीची मदत, सामाजिक सुरक्षा या सारखे अनेक फायदे व उद्देश असल्याचे पवार यांनी सांगितले. तरी सर्वांनी दोन्हीही कार्ड काढून घेण्याचे आवाहन केले. त्यांनी कार्ड काढणाऱ्या टीमचे व आशा वर्कर यांचे आभार मानले.